Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chhaya Desale

Others

3  

Chhaya Desale

Others

दिवाळी

दिवाळी

1 min
425


 दिवाळी सणाचा वेगळाच थाट 

दीप लावून उजळले ताट

 दारी तोरण सजले पाट

 पुरी,शंकरपाळी, करंज्या लाट /1/


 सडा-रांगोळी सजले अंगण

 अंगी उटणे लावणे चंदन

सारे करिती देवाचे पूजन

 करुनी मोठ्या माणसांना वंदन /2/


 सासुरवाशीन माहेरी येई

 घरादाराला आनंद होई

 बालगोपाळांची खेळण्याची घाई 

लेकीला गोड-धोड करी आई /3/


 फराळ, फटाक्यांची आतिषबाजी 

छोट्या -छोट्या गोष्टी सांगे आजी

 सर्वांना आवडे गरमागरम भजी 

नवे कपडे घेऊन देई दाजी /4/


 दागदागिने घालून देवांना सजवती 

धनाची,कुबेराची पूजा करती

 बहीण भावाला ओवाळती

 निरोगी आरोग्य ईश्वराकडे मागती /5/


दिवाळीचा सण असे खास

 सर्वांच्या शरीरावर चढे मांस

 मामाला मिळे फिरायला पास

 म्हणूनच आम्हाला दिवाळीची आस /6/


Rate this content
Log in