अभंग गुरू
अभंग गुरू
1 min
194
शिक्षणाची वारी । घेऊन हो दारी।
चला मग सारी। बाई म्हणे
प्रेमाची महती ।गुरूंची हो सारी ।
सांगूया ना घरी । पालकांना
देती हो छान ।अप्रतिम ज्ञान ।
मिळे मग मान। समाजात
आभाळासारखे ।अथांग सागर।
मूर्ती हो सुंदर । शिक्षकांची
जीवनी आपुल्या । भरती सुगंध।
पसरला गंध ।चोहीकडे
शिक्षकांचे स्थान। अनमोल फार।
देईल आकार। बालकांना
उन्हातही देती ।सावली अपार ।
त्यांचे उपकार ।जीवनात
कीर्ती पसरावी ।संपूर्ण जगात ।
घडी सुसंस्कृत। नागरिक
शिक्षणाचा वसा ।चालू या आपण।
करूया शिक्षण। बालकांचे