बायकोचं भांडण
बायकोचं भांडण
बायको माझी गावभर
निघाली बोंबलत
म्हणे नवऱ्याने माझ्या
केली दुसरी हो सवत
ही फिरते गावभर सांगत
म्हणे दाखतो तिची आवड
लग्नाआधीची ती निवड
नाही मी कुठल्या भानगडीत
कसी काढू मी तिची समजूत
ही फिरते गावभर सांगत
म्हणे लग्नाआधीच साधंपण
यानं केलं बाई मला उणंउणं
नाही ठेवली मला किंमत
आणून ठेवली म्हणे सवत
ही फिरते गावभर सांगत
कुठं भेटली ही अवदसा
म्हणे मला नाही सोसत
नाही रात्रीची झोप मला लागत
कसं डोळ्यात इच्चा नाही बसत
ही गावभर फिरते सांगत
