STORYMIRROR

Shital Yadav

Romance

3  

Shital Yadav

Romance

बावरी

बावरी

1 min
28K


ऋतू येती अन जाती

चित्त आकर्षूनी घेती

श्रावणोत्सव गं कधी

शीतल गारठा कधी


श्रावण झड भिजवी

पाने -फुले मधुबनी

मातीचा गंध ही करी

नकळत धुंद जीवनी


गवताच्या पात्यात

डोले दव बिंदु मोती

फुलांच्या सहवासात

मोहरली ही धरती


खळाळून वाहे झरा

सरिता ही फेसाळली

फिरुनी रानावनात

दिशादिशात व्यापली


नव परिणीता साजे

वसुंधरा ही निराळी

बघता गालावरची

खुलून दिसे गं खळी


विलक्षण सौंदर्याने

डोळे दिपवी लाजरी

हिंदोळ्यावर हर्षित

होऊनी आज बावरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance