STORYMIRROR

Sandeep Dhakne

Inspirational Others

4  

Sandeep Dhakne

Inspirational Others

बाप

बाप

1 min
287


शेतकरी बाप माझा

काय सांगू त्याची कथा

रोज खेळे मातीसंगे

माडंली ना कधी व्यथा 


निळ्या आभाळात दिसे 

जवां बापाची रे काया

बाप सांगे तवां मला

लाव धरणीला माया 


कधी पायाच्या भेगात 

दिसे नशिबाच्या रेषा

मिटेल कधी अंधार

येईल सुखाची उषा 


घामाच्या रे धारात 

भिजते काळी माती 

जमीनीचे तुकडे पडता 

दुरावली किती नाती 


सांभाळून संसार असा

दिला जगाया आधार

कसे फेडू उपकार त्याचे

जीवन माझे साभार 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational