बाप
बाप
बाप माझा तलवार मायेची सावली
खस्ता खाऊनी दिवे वाळवंटी लावली
दुःख काय असते कधी ना कळू दिले
धन्यता माना ज्यांना बाप जीवनी लाभले
उपकार अनंत बापाचे कळते गेल्यावर
जिवंतपणी आज्ञेत वागावे नावही कर
वेळ मिळतच नाही हात फिरवतो झोपल्यावर
बारा भानगडी केल्या शिकावे म्हणून पोरं
