बाप
बाप
बाळाला आईची माया हवी असते,
तरुणाला बापाची छाया हवी असते.
बाळ-तरुण-माणसाचा अवरुध्द रस्ता असतो,
आई-वडिलांचे मार्ग़दर्शन बुद्धाचा मार्ग असतो.
आईच्या मायेसोबत तीचा आशिर्वाद असतो,
पण क्षणा-क्षणाला बापच मार्गदाता असतो.
पितृत्व आल्यावर बापाचे महत्व कळते,
मगच लाचार बापाचे व्यक्तित्व समते.
छोटया-मोठ्या संकटात आई आठवते,
जीवन-मरण्याच्या वेळी फक्त बापच आठवते.
बापाच्या कर्माचे ते प्रसंग आठवते,
वेळो-वेळी केलेला बापाचा त्याग जानवते.
मुलांच्या ईच्छापूर्तीसाठी तो बळी पडतो,
स्वतःच्या भावनांची हत्या तो नेहमी करत असतो.
कधी रागाने, कधी प्रेमाने,कधी सक्तीने,
उज्ज्वल भविष्यची निव भरत असते आशेने.
मुक्तिदाता बनने त्याच्या हाती नसते,
मार्गदाता म्हणून सदा वावरत असतो.
मातातुल्य बापाचे महत्व कधी कमी नसते,
ते समजण्याची आमची योग्यता तेव्हा नसते.
