बाप माझा शेतकरी
बाप माझा शेतकरी
बाप शेतकरी होता
मला त्याची लाज वाटायची
तो बाप होता
त्याला मुलाची आस असायची
साऱ्या जगाला जेवणाच ताट
वाढतोय माझा बाप
अभिमान तर वाटतोय
पण कुठे फेडु ते पाप
त्याच्या मुळे जग सार सुखी
ना दिसती त्याच दुःख
त्याच खाऊन सर्व सुखी
त्याच्याच नशिबात आलय दुःख
रात्र दिवस धेकळात मरी
बाप माझा शेतकरी
नसे त्याला किंमत जरी
बाप माझा शेतकरी |
