बालविवाह
बालविवाह


बालविवाह
बालविवाह कायद्याने गुन्हा
कळणार तुम्हा हे कधी?
करु नका हो लग्न मुलीचं
अठरा वर्षांच्या आधी...
मुला मुलींना द्या शिक्षण
होईल सुखी, संपन्न जीवन,
बालविवाह विरुध्द मोहीम
राबवू समाजामधी....
अहो योग्य वयानंतर
लग्न करावे बरं,
शासन सांगतंय ओरडून
हे तुम्हा समजणार कधी...?
बालविवाहाचे दुष्परिणाम
होई उध्वस्त जीवन ,
बालमृत्यूचे प्रमाण
वाढे समस्या समाजामधी...
ऐका हो बाबा
ऐक ना ग आई,
शिकून साहेब व्हायचं
नको लग्नाची घाई...
मुलीचं वय अठरा वर्षे हवं
एकेवीस पेक्षा कमी मुलगा नसावं,
बालविवाह मी तर
करणार नाही....
गायकवाड आर.जी.दापकेकर