STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

3  

Shila Ambhure

Inspirational

(बाळाविन)आईची व्यथा

(बाळाविन)आईची व्यथा

1 min
298




शोधण्या तुला

कुठे कुठे जाऊ?

कशी गाऊ?

अंगाई.


सूना सूना

हलतो एकटा पाळणा

निस्तेज खेळणा

एकाकी


सारीकडे तुझेच

होतात मजला भास

जीवाला आस

तुझीच.


कुणा जोजवू

घास कुणा भरवू

हट्ट पुरवू

कुणाचे?


'बाळ' म्हणुनि

कोणास घालू साद?

पैंजणाचा नाद

घुमतो.


क्रूर किती!

नियती घात तुझा

बाळ माझा

हिरावलास.


कशी मिरवू?

बाळाविना मी आई

झाले बाई

वेडीपिशी!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational