बाळ
बाळ
सर्वांचे मन आतून खूप हसते आहे ....
ओठावर गोड हसू आणि....
खडी मात्र गालावर उमटत आहे....
आज वर हे फक्त चार भिंतीचे घर वाटत होते ...
आता इवल्याश्या पायांनी सर्व घर सजले होते...
जगातील सर्वात आनंदी वातावरण घरात शिरले आहे ....
बाळाच्या आल्याने आता घर रमणीय झाले आहे...
बाळाच्या आगमनाची बातमी मिळता सर्वांना ...
जसे एक प्रकारची सर्वांची पगार वाढच झाली आहे...
त्याच बरोबर बोनस म्हणून त्यांना जसे बाळाच्या रुपात एक प्रकारचे प्रमोशनच मिळाले आहे....
कोणाला सर्वात मोठी पोस्ट ही आजोबा , आजीची मिळाली आहे....
तर कोणी आई , बाबा तर कोणी मामा मामी बनले आहे ....
आत्याने तर गमती जमतीत सासू बाई ची पदवी घेतली होती....
दुःख सारे पळून गेले होते...
आनंदात सर्व बाळा सोबत हसू लागले होते......
या आधी पण असेच वातावरण मुलाच्या जन्माच्या वेळेस झाले होते ......
आज पुन्हा तेच वातावरण मुलीच्या जन्माने अनुभवते आहे....

