बाजीराव मस्तानी...
बाजीराव मस्तानी...
हा मराठा प्रेमात वेडावला ,
प्रेमाखातर झुगारून बंधनाला,
प्रितीत दंगला ,
प्रेमासंग रंगला...
जींकण्याची परंपरा पेशवाईची श्रीमंती,
पण त्यांना मिळाली श्रीमंती औरच,
जी भेट दिली त्यांना ,
ती मन जिंकुन गेली ,
मनास भुलवुन गेली...
त्यांच्या मनात ती ठहरली,
परंपरेची बंधने झुगारली,
प्रेमात तिटतिट तुटल्या तारा ,
ही गाठ प्रितीने बांधली...
मग्न ती झाली,
हरवुन गेली ,
गित प्रेमाची गाईली,
प्रितीची कहाणी सुरु ,
प्रितीनेच संपली ...
हा मराठा प्रेमात वेडावला ,
प्रेमाखातर झुगारून बंधनाला,
प्रितीत दंगला ,
प्रेमासंग रंगला...
श्रीमंत पेशव्यांच्या प्रेमाची ,
युगायुगाने ग्वाही दिली ...
बाजीराव मस्तानीची ओळख,
प्रेमाने करून दिली ...
हळव्या मनाने कहाणी सांगितली...

