STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

बाई

बाई

1 min
253

 पूर्वी लोक म्हणायचे

 बाई घराची लक्ष्मी असते 

एकत्र कुटंबात सुद्धा

वेगळे रहात नव्हते 


बाई होती एक आदर 

वस्र होती अंगभर 

मोठ्यांचा मान राखून

डोक्यावर घेत होती पदर


खानदानी म्हणून आईबापाची 

लेक सासरी नांदत होती 

थोड्या गोष्टीसाठी कधीही 

वाईट सांगत नव्हती 


बाप मुलीचे भिकार लाड 

कधीच पुरवत नव्ह्ता 

सासरीच नांदावे मुलीने 

आग्रह धरत होता 


जेष्ठ लोकांचे शब्द तो 

कधीच मोडत नव्ह्ता 

दिलेला शब्द बैठकीतला 

आयुष्यभर पाळत होता 


बापाच्या धाकाने मुलगी 

सासरी नांदत होती 

मुलाबाळांचा सुखी संसार 

सासरी करत होती 


आई बाप सुखी समाधानी 

चिंता भविष्याची नव्हती 

फाटक्या संसाराला मुलीच्या 

हातभार लावत होती 


सासू सासरे आई वडील 

हे संस्कार शिकवत होते 

खोटे गार्हाने केल्यास 

तिलाच मारत होते 


त्यामुळे घटस्फोट दुर्मिळ 

कुठे एखादाच दिसे 

आता सुशिक्षित पिढीत 

विचाराचा ताळमेळ नसे 


मुली अगोदर आई वडील

आग्रही दिसतात 

मुलीला समजून सांगण्याऐवजी 

आपल्या घरी आणतात 


एकट्या मुलीच्या सुखासाठी 

सासू सासरे बेवारस होतात 

नवरा बायको त्यांची मुले 

हाच संसार समजतात 


यातून झाले विभक्त कुटुंब 

माया आजी,आजोबाची सरली 

तिच नातवंडे मोठी होऊन 

आई वडीलांना विसरली 


संस्कार,संस्कृती पैश्यातून 

कधीच मिळत नाही,

आजी,आजोबांचे प्रेम अनमोल 

बाजारात मिळत नाही 


विभक्त कुटूंब संसारात 

डोकेदु:खी ठरली 

भांडणे, कलह, वाद होऊन 

घटस्फोटाला कारणे मिळाली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational