बाहेर ऊन वाटत
बाहेर ऊन वाटत
आता ऊन जरा जास्त झाले
बाहेर निघताच झळा वाहे...!
शोसल्या झळा त्या शरीराने
गारवा तो कोठेच नव्हे...
मनाची चैलबीचल झाली
भर उन्हाची सावली झाली..!
आसरा घेत चाललो
पण अवस्था वेगळी झाली...
थांबलो आहे सावलीत
उन्हाची झुंज पसंद नाही..!
भर उन्हात जातांना
कसलीही खंत नाही...
वाटा वेगळ्या पाऊलांच्या
मनाचा मनाशी गारवा..!
तापले आहे शरीर
बघितले तिला उन्हात परवा...
ह्या,उन्हाने जमिनीचे
पाणी मग शोसले..!
अडखळनाऱ्या शरीराला
क्षण ते उन्हाचे दिसले...
प्रत्येक लाटेत
मन दाटते..!
थोड थांब सखे
बाहेर ऊन वाटते...
कसली परवा ती उन्हाची
आतास जरा जगू वाटत..!
सळसळनाऱ्या उन्हात
कोणी कसं भेटत...
