STORYMIRROR

Sagar Jitendra Bangar

Inspirational

3  

Sagar Jitendra Bangar

Inspirational

बाबा

बाबा

1 min
240

आज माझे बाबा म्हणाले,

माझ्या लेकीन माझे नाव उंचावले

खरं सांगा मित्रानो

यापेक्षा मोठे मी काय कमावले...

पैसा नव्हता खिशात

पन उसनवारीने शिकवले

आत्मनिर्भरी होता बाप

पण मायासाठी चपला झिजवले

म्हणे तू लई मोठी हो

म्हणून डोईवर हात सजवले

खर सांगा मित्रांनो

यापेक्षा मोठे मी काय कमावले...

मोलमजुरी करून त्याने

पोटाची खळगी भरवली

उन्हातान्हात घाम पिऊन

पाण्याची तहान भागवली

रानात राहून उपाशी

माझ्या भुकेचे स्वप्न सजवले

खरं सांगा मित्रानो

यापेक्षा मोठे मी काय कमावले....

नको मोठा बंगला मला

पैसा अडका काही नको

नको सुंदर देखणे रूप

सौंदर्याची खाण नको

माझ्या यशाचे चित्र

त्यांनी डोळ्यात आपल्या सजवले

खर सांगा मित्रानो

यापेक्षा मोठे मी काय कमावले.....

भाकरी ठेऊन मला

ते उपाशीपोटी निजले

गरीबी होती मोलाची

तिनेच आम्हाला शिकवले

नशीब माझे की त्यांचे नाव

माझ्या नावापुढे लागले

खर सांगा मित्रानो

यापेक्षा मोठे मी काय कमावले...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational