अव्यक्त भाव
अव्यक्त भाव
मन माझं व्यापून जाई शब्द तुझ्या कवितेतील
जग माझे निरखुनी पाही भाव तुझ्या नयनातील
गूज क्षणाची साद घाली अस्त उदयात प्रभेतील
ओढ नभाला साथ देई सर बरसत्या पावसातील
ऋतुपर्ण ही बहरूनी येई चाहुल नव जिवनातील
भाव मनीचा न कळूनी आसवात ही नभ न्हातील
आसमानी रंग सागरी मनीच्या तळी शोधतील
भासमनी कुणी जपली ती सावली मना भावतील
अधिरतेस भान मागशी अथांगता कुठून आणशील
सल कोवळ्या उन्हाची आभा सुर्याची साहतील
मनाची व्यथा अनोळखी नाती नभाशी सांगतील
कुणी का काही सांगितील अबोल ऋणानू बंधनातील
मनाचं काही ना कळतील अव्यक्त ओढ अंतरीतील
आसमानी रंग सागरी आसवात त्या नभ न्हातील

