STORYMIRROR

Pratibha Vibhute

Inspirational

3  

Pratibha Vibhute

Inspirational

औक्षण

औक्षण

1 min
457

दादा आयुष्यभर साथ दे रे

या तुझ्या लाडक्या बहिणीला

सदैव भुकेली आहे बघ ही

दादा तुझ्या माया,प्रेमाला...१!


नकोच मजला काही आता

भाऊबीजेला करते औक्षण

या करीता नेण्यास यावे

आनंदाचा घालवूया क्षण...२!


औक्षण करून मागते एक

वचन दादा तुझ्या कडे

नको अंतर देऊस जीवनी

आनंदाने माया कर गडे...३!


आई,बाबांना मात्र सांभाळ

केले आपले संगोपन छान

हट्ट सारे पुरविण्यासाठी रे

आयुष्य ठेवले बघ गहाण...४!


ताई,दादाचे प्रेमळ नाते

शेवटपर्यंत टिकवून ठेऊ

अंतसमयी दादा आपण

हे आनंदी क्षण सोबत नेऊ...५


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational