अत्याचार
अत्याचार
रस्त्यावरून चालणाऱ्या कुत्र्यांची नाही
तर जनावरांसारख्या वागणा-या माणसांची झाली भीती
क्षणभराच्या वासनेपोटी काय झाली
समाजातील नराधमांची नीच नीती......
किती दिवस चालणार स्त्रियांवर अत्याचार
का झाला रे समाज आणि प्रशासक लाचार
का संचारतो आहे माणसांमध्ये असा दुष्कृत्य विचार.......
कधी संपणार नारीचा हा बलात्कारी वनवास
सुंदर तिच्या देहाचा अश्लील चाळ्यानी नको करू रे नाश
जागृत होईल स्त्री शक्ती तर नराधमा देईल रे तिच तुला गळफास...
काय होता रे प्रियंका रेड्डीचा सांगा गुन्हा
एका निष्पाप स्त्रीला जीव गमवावा लागला पुन्हा
अरे कुणीतरी स्त्री रक्षणाची ढाल बना......
अशा किती स्त्रियांचे कापणार रे तुम्ही गळा
माझ्या आया बहीणीनो आता तुम्हीच या नराधमांना जाळा
तेव्हाच फुलतील नवीन फुलांचा निर्भीड मळा......
कसे आणि कुणावर ठेवावं या स्त्रीने विश्वास
आपल्याच लोकांमध्ये गुदमरतोय तिचा श्वास
अरे माझ्या भावानो आता हा गुन्हेगारी प्रवृत्ती झाली ना बास.....
मनी बाळगा रे सगळ्यांनी एकचं ध्यास
झाला पाहिजे स्त्रियांवरील वाकड्या नजराचा -हास
नको दिवसेंदिवस वाढणारा वासनेचा वास....
