अट्टाहास का, करतो?
अट्टाहास का, करतो?
येताना एकटा येतो,
जाताना एकटा जातो,
बरोबर काहीही आणत नाही,
जाताना बरोबर काहीही नेणार नाही,
तरीपण श्रीमंत होण्याचा अट्टाहास का असतो?
सुखासाठी रात्रंदिवस झाडतो,
दु:खात कोणीही सामील नसते,
आहारात सर्वकाही असते,
पण तब्बेत साथ देत नसते,
तरीपण गर्व,
अहंकार करणे चालू,
अट्टाहास का करतो?
जगात कोणी नाही कोणाचा,
भाऊ भावाचा वैरी असतो,
पत्नी, मुले देखावा असतो,
पापाचा कोणीही वाटेकरी नसतो,
तरीपण नाते-गोत्याचा,
अट्टाहास का करतो?
