अट्टाहास जरूर करावा
अट्टाहास जरूर करावा
मज वाटे अट्टाहास जरूर करावा
फक्त सदैव चांगल्या कामाचा असावा ।।१ ।।
क्रांतिकारांनी केला खूपच अट्टाहास
देश स्वातंत्र्यासाठी होता त्यांचा प्रयास ।।२ ।।
पांडवांचा अट्टाहास खेळ जिंकण्याचा
त्याने इतिहास झाला महाभारताचा ।।३ ।।
शिवाजी राजेंचा अट्टाहास स्वराज्याचा
आज ही जय जयकार महाराष्ट्राचा ।।४ ।।
अट्टाहास तो वंश मुलाचा कुळासाठी
गर्भात मारतात मुलीला मुलासाठी ।।५ ।
पारंपारिक चाली रिती ज्या फायद्याच्या
अट्टाहासाने जतन करा कायद्याच्या ।।६ ।।
अंधश्रद्धा निर्मुलनाचा तो अट्टाहास
नष्ट करा मागासलेल्या लोकांचा भास ।। ७।।
ज्ञान ग्रहणाचा सदा धरा अट्टाहास
पण पैशाचा नको कुणा जास्त अव्यास ।। ८ ।।
शांतता निती मत्तेला हवा अट्टाहास
प्रत्येकांने नकार द्यावा भष्टाचारास।। ९ ।।
सत्कर्माचा सदैव धरावा अट्टाहास
लोकहितासाठी करावा सदा प्रयास. ।। १० ।।
