असं असून काय फायदा...
असं असून काय फायदा...


प्रेमळ असून काय फायदा...?
जर त्याच्या हृदयात माझ्यासाठी जागाच नसेल...
हसरी असून काय फायदा...?
जर माझ्या हसण्यावर तो भुलतचं नसेल...
आपुलकी असून काय फायदा...?
जर तो मला आपलंच मानत नसेल...
मनकवडी असून काय फायदा...?
जर त्याला माझ्या मनातलं कळतचं नसेल...
हृदयस्पर्शी असून काय फायदा...?
जर त्याच्या मनाचा ठोका दुसरंच कोणी असेल...
सुंदर असून काय फायदा...?
जर त्याला माझ्या चेहऱ्यामागचं दुःखचं कळत नसेल...
सुरेल असून काय फायदा...?
जर माझ्या प्रेमाच्या हाकेला तो सादचं देत नसेल...