अश्रू....
अश्रू....


होय हे माझे अश्रू नेहमीच मला साथ देतात सुखात आणि दुःखात ही.
त्यांना कितीही अडवायचा प्रयत्न केला तरीही ते ओघळतातचं.
माझे अश्रू माणसांच्या गर्दीत असताना,तुंबलेल्या पाण्यासारखे पापण्यांच्या आत असतात.
पण एकटी असल्यावर तुझी आठवण काढुन नेहमीच वाहत असतात.
माझे अश्रूच माझ्या सर्वांत जवळचे आहेत.
काय हो...!
आपली सावली तरी आपल्याला कुठवर साथ देते...?
अंधार आला की गायब होते.
हे अश्रूच बरे ना, माणसं तरी अर्ध्या वाटेवर सोडून जातात;
काळजावर अगणित घाव करून जातात...
पण.......पण.......
हे माझे अश्रू, नेहमीच मला साथ देतात.