Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sanjay Dhangawhal

Inspirational

3  

Sanjay Dhangawhal

Inspirational

अश्रू...

अश्रू...

1 min
244


पुसून अश्रू पुसायचे किती

बोलुन खोटे फसवायचे किती

रडून बेजार होतात डोळे

सुख दुसऱ्याचे दाखवायचे किती


वेदनांना फाटे देणारे किती

दुख आपुले ऐकणार किती

घाव घालून पळतात दूर सारे

जखमांना मलम लावणार किती


हात जगण्याचा देणार किती

आधार घेवून पळणार किती

श्रमाशिवाय जगणेतरी आहे कुठे

परक्या डोळ्यांनी जग बघायचे किती


काळ सुखाचा आल्यावर

माणसे स्वार्थी भेटतील किती

दूर सारणारे जमतील किती

आपले म्हणारे बसतील खेटून

जळून राख होणारे

गळाभेट घेतील किती


Rate this content
Log in