अश्रू
अश्रू
😢😢
अश्रू असतात दोन प्रकारचे
अव्यक्त भावनांचे
व्यक्त केलेल्या आनंदाचे
एक सुखाचे आणि दुसरे दुःखाचे
अथांग सागर तो खोल
नजरेत भरलेला
नाही थांग त्याचा लागे इतका स्वतःत विरलेला😌
ओघळती गालावर अश्रू कोणी म्हणते त्यास मोती🥺😢
एक एक थेंब तो मोती
लाखाहून असे किमती
कुणास वाटे ते फक्त पाणी
किंमत त्यालाच
जो त्यातील फरक जाणी
सुखाच्या अश्रूत शांतपणा
दुःखाच्या अश्रूत असतो हाहाकार
सुख-दुःख, कारूण्याची, आनंदाची त्यास
असते किनार म्हणुनी वाहते डोळ्यांमधून अश्रूंची धार 😭
सुखदुःखाचा प्रवाह अश्रू
मार्गे होतो
तो प्रत्येकाच्याच वाट्याला कधी ना कधी येतो😔
स्वतःहा ठरवावे अश्रूंचे मोल
एक एक अश्रू आहे किती अनमोल...
सांभाळून ठेवा अश्रूंना
नका वाया घालवू
नका समजू कमजोर
स्वःताला कधी
आपल्या अश्रूंना व्यर्थ
वाहू नका देऊ
म्हणूनच
जोडावी अक्षरे खोडव्या चुका
हसावे सदा लपून दुःखा
क्षणांचे मणी अलगत ओवावे
आनंदी सुरांनी मनास छेडावे
कुणाचे अश्रू पुसावे
कुणाचे हास्य पांघरावे
कल्पनाच्या कुचल्यांनी क्षणभंगुर
जीवनाचे चित्र रंगवावे..😊
अंधार जगाचा प्रकाशात नहावा
उघडावी मने उजेड दिसावा
मुखी साखरेचा गोडवा असावा
मनी कुणाचा कधी
रागद्वेष नसावा
सुखाचे अश्रू गिळावे दुःखाचे अश्रू पुसावे परिवर्तन तेच सुख लुटता लुटता आवरावे
अश्रू पुसता पुसता संपवावे..
सुख-असो वा दुःख
नेहमी डोळ्यात अश्रूला सजवावे...
अव्यक्त भावनांचे व्यक्त
केलेल्या आनंदाचे
नाही आठवत शब्द तरी जीवनात सुरेल गीत गावे☺️😊
