अशी रंगली तुझ्यात
अशी रंगली तुझ्यात
अशी रंगली तुझ्यात
की आता काहीच सुचेना
ओठांवर येतात शब्द
पण तेही आता बोलेना
वेळी अवेळी कधीही
आठवण तुझी येते
माझ्यापासून माझे सारे काही
क्षणात हिरावून नेते
कोणाला दाखवायचे नाही मला
माझे मन कसे तुझ्यात आहे गुंतले
तुझ्यासवे नसतानाही
तुझ्याच पाठी कसे ते लागले
तुझ्याच विचारात मग्न माझे हे मन
तू जवळ नसतानाही तुझीच लागली आहे आस
आता तर अशी तुझ्यात रंगले की
तुलाच मिळवण्याचा या जीवाला लागला आहे ध्यास...
