STORYMIRROR

Arun V Deshpande

Romance Abstract

2  

Arun V Deshpande

Romance Abstract

असे कुठे असते ?

असे कुठे असते ?

1 min
13.6K


प्रेमात खरेच खूप जादू असते

म्हणून म्हणतात की सारेच

प्रेमात पुन्हा पडायचे असते .

मनापासून प्रेम करायचे असते,,,|

ते असे लपवायचे ही नसते .

 भाषाच त्याची निराळी असते

ज्याला समजायची त्यालाच 

बरोब्बर समजत असते ....|

कधी शब्दातून -कधी नजरेतून

मनातले सारे सांगायचे असते .

अपयश ते प्रेमाचे कधी नसते

ते प्रेमातल्या माणसाचे असते ...|

भावना की - व्यवहार यातले त्याचे

मूळ गणितच जेंव्हा चुकते

मन तोंडघशी पडते ,फसते

म्हणून पुन्हा प्रेम करूच नये

असे कुठे असते ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance