STORYMIRROR

BABAJI HULE

Romance

3  

BABAJI HULE

Romance

असे कुणी तरी मिळावे

असे कुणी तरी मिळावे

1 min
168

खेळतांना प्रेमाचा खेळ 

दयावा एकमेकांच्या साथीला वेळ, 

असे कुणी तरी मिळावे 

त्याला दुःख सांगताच कळावे     II

नाती बदलली कि प्रेमाचा अर्थ बदलतो 

प्रेमाची व्याख्या बदलली की स्वार्थ ही वाढतो, 

प्रेमाला कसलाही फॉर्म नसतो 

परंतु प्रेमानेच आयुष्याला अर्थ येतो    II

नियोजन करून प्रेम घडविले जात नाही 

आकर्षणाबरोबर निखळ-नितळ मैत्रीही हवी, 

या छोट्याश्या प्रवासात मला हवी तुझी साथ

स्वप्नांच्या दुनियेत करावी सुख दुःखाची बरसात    II

झुळझुळते पाणी आणि गंध वाऱ्याचा 

झरे पापण्यांचे आणि थेंब आसवांचा, 

मावळता सूर्य आणि रात्रीचा चंद्र असतो साक्षीला 

वाट अनोळखी परंतु उब देशील का भिजलेल्या मनांला   II

 

शिणलेल्या, थकलेल्या मनाला प्रेमाचा ओलावा हवा आहे  

भुकेलेल्या, तहानलेल्या जीवाला हाथाची ओंजळ हवी आहे,

वाऱ्या वादळांत, उन्हातान्हात साथ तुझी हवी आहे 

अंधार-पावसात, बोचऱ्या थंडीत प्रीत तुझी हवी आहे  II

मैत्री संभाळता संभाळता ती टिकवताही यावी 

स्वतंत्र जीवन जगताना दुनियाही प्रेमाची व्हावी, 

एकमेकांच्या स्पर्शाने मन हळवे हळवे व्हावे 

काटेरी आयुष्यात अनमोल भेटीने जीवन कृतकृत व्हावे  II

उमलत्या मैत्रीचे फुल उमलू दे 

शृंगार नको पण वास्तल्याचे प्रेम वाढू दे, 

अनमोल जीवानातं साथ तुझी हवी आहे 

शेवटच्या श्वासापर्यत हाथ तुझा हवा आहे  II

तुझ्या असण्याने जीवनालाही रंग भरावा 

स्वछंदी मनाने आकाशाला स्पर्श करावा,

दुःख दिसताच प्रेमाचा पाझर फुटावा 

असे कुणीतरी मिळावे त्या जगण्यालाही अर्थ यावा  II


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance