असे का घडते ?
असे का घडते ?
क्षणिक सुखाच्या आनंदाची
मजा नराधमांनी चाखली,
कोवळ्या त्या कळीला भोगून
क्षणार्धात कोमेजून टाकली
पाणावलेल्या नयनांमध्ये
अश्रू मावेनासे झाले,
बागडण्याचे जीवन जणूकाही
तिच्यासाठी संपून गेले
काडीमात्रही दोष नसूनी
आयुष्य माझे का उदध्वस्त झाले ?
एकांतामध्ये बसल्या बसल्या
असंख्य प्रश्न तिच्या मनामध्ये आले
न्याय मागण्या गेल्यावरही
चारित्र्यावर हल्ले झाले,
सबळ पुरावा नाही म्हणूनी
दोषी सगळे सुटून गेले
असाच दुर्दैवी अनुभव
बर्याच अबलांना येतो,
सुंदर त्यांच्या आयुष्याला
वेगळेच वळण देऊन जातो
सूज्ञ म्हणवणारा समाजदेखील
त्यांचीच घृणा करू लागतो,
टोचून टोचून जीवंतपणी हा
त्यांनाच मरणयातना देतो
ह्रदयद्रावक या घटना पाहून
एक कोडे मनाला पडते,
स्त्री तर असते घराघरामध्ये
तरीसुद्धा असे का घडते...?
