असा एक दिवस नाहीं की तुझ्याशी.
असा एक दिवस नाहीं की तुझ्याशी.
असा एक दिवस नाहीं की तुझ्याशी
बोलल्याशिवाय माझा दिवस निघून
जातं नाहीं.....!
असा एक दिवस नाहीं की तुझ्याशी
तुझ्या घरापासून गेल्याशिवाय रहात
नाहीं.....!
असा एक दिवस नाहीं की तुझ्या
नजरेला नजर भिडल्याशिवाय
मन भरत नाहीं.....!
असा एक दिवस नाहीं की तुझ्या
मनांत असणाऱ्या विषयाला वाचा
फोडल्याशिवाय गप्प बसतं नाहीं......!
असा एक दिवस नाहीं की दिवसभरात
तू नाहीं भेटली की मला सैरभैर झाल्याशिवाय
राहवत नाहीं.....!
असा एक दिवस नाहीं की तुला फिरायला
घेऊन गेल्याशिवाय माझ्या मनाला शांती
भेटत नाहीं....!
असा एक दिवस नाहीं की तू रांग
माझ्यावर व्यक्त केल्याशिवाय राहतं नाहीं.....।
असा एक दिवस नाहीं की तुझ्यासोबत
घराचा रस्ता कटत नाहीं......!
असा एक दिवस नाहीं की तुझ्याशी
केलेली चर्चा संपत नाही तु हसल्यावर
माझ्या मनाला उभारी येतं नाहीं.......!
असा एक दिवस नाहीं की तुझ्याशी
केलेल्या प्रेमाची कबुली दिल्याशिवाय
माझ्या मनाला भुरळ पडल्याशिवाय
जमतं नाहीं......!
असा एक दिवस नाहीं की तू माझी आठवण
काडल्याशिवाय मला उचकी थांबत नाही....!
इतकं सगळं होऊन हीं तू माझी राहीली नाहीं
मी असा काय गुन्हा केला तू मला सोडून
दुसऱ्याशी नातं जोडून निघून गेली.अजूनही
माझ्या मनाला विश्वास बसत नाही.......!
खरं प्रेम करून हीं तू माझ्यापासून हीं
एक गोष्ट लपवून ठेवली ही दुसऱ्याकडून
कळली मलाच लक्षात येत नाहीं.......!
असं काय माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच
घडलं मला अजून कोडं सुटलं नाहीं रे......!
खरंच खूप तुला मिस करतं होतो.
तू अस करशील मला जाणवलं सुद्धा नव्हतं यार
शेवटी तूंच होता माझा आधार.
आता झाला माझ्या आयुष्याचा अंधुक अंधार
माझ्या हृदयावर केला तू जखमी वार.
एक सचा तुझा प्रियकर......!

