अरे पावसा
अरे पावसा
अरे अरे पावसा
असे वागू नको
उतु नको मातू नको
असे वेडवाकडं
वागु नको ।१।
आम्ही खायचे काय
प्यायचे काय
जगायचे कसे
भाकरविना उपाशी
आम्ही मरायचे तसे । २।
तुझ्यापायी किती
बळीराजा फासावर
लटकले तसे
तुझ्यामुळं कित्येंकाचे
संसार मोडला आहे । ४।
तुझा हाहाकार किती
आम्ही पाहिला आहे
तुझ्या दुष्काळ ,पूरात
जग सारं बुडतं । ५।
तुझा मनमानी कारभार
बंद कर रे पावसा
आता येवू दे
पिकाला उभारी
नाहीतर होईल
अन्नासाठी मारामारी । ६
