अपेक्षा
अपेक्षा
प्रेम कुटुंबात अती
हळवी भाबडी नाती
ओझे अपेक्षांचे बाळगता
हृदयास कष्ट किती?
हे माझ्या मना
थांब ना तू जरा
करतोय अपेक्षा
तू किती साऱ्या
अपेक्षा म्हणजे
हळव्या मनाच्या
अर्पूण भावना
जीव ओवाळून
सलणा-या वेदना
अपेक्षांचा डोंगर
किती वाढवणार
दुःखाच्या गर्दीतून
तुला कोण सावरणार
नको रे बाबा रे
अपेक्षा या जास्त
रहा तू समाधानी
नेहमीसाठी फक्त...