वेदना
वेदना
जगणे -मरणे दोन
टोकातील अंतर वेदना
हसणे- रडणे
चेहऱ्यावरील
मंतर वेदना
भाव-भावनांचा
विस्कटलेला
डाव वेदना
शब्द- शब्दातील
पोरकेपणाचा
आव वेदना
मानवाच्या मनामध्ये
जन्म घेते ही वेदना
कमी जास्त प्रमाणात
असे तिची ही संवेदना..
वेदनेशिवाय किंमत
कुठे कळते सुखाची
त्यातूनच ओळखावी
जाणीव दुसऱ्यांची
वेदना मानवाला
जगण्यास शिकवते
स्वतः सारखे मजबूत
आणि खंबीर ही बनवते
जीवनात वेदनेवर
नित्य फुंकर घालावी
होऊनिया रममाण दुःख
दुसऱ्यांची जाणावी