STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others Tragedy

3  

Sanjay Raghunath Sonawane

Others Tragedy

अस्वच्छतेच्या बोंबा

अस्वच्छतेच्या बोंबा

1 min
14.8K


आंनद सणाचा साजरा झाला खरा

कचऱ्याचा जागो जागी साचला ढिगारा

ध्वनी प्रदूषणाचा कायदा कोण पाळतो

कायदा होऊन फक्त कागदावर राहतो


वायुप्रदूषणाचे वाढले जीवघेणे प्रदूषण

आजाराने त्रस्त त्यांचे होते रे मरण

फटक्यांनी तर कहरच केला

भयभीत होऊन लहान थोर पळाला


सरकारी रस्ते झाली यांची हो मालमत्ता

कोण त्यांना विचारेल म्हणती आम्ही कार्यकर्ता

स्वच्छतेच्या नावावर हेच राजकारण करती

खरे कार्य करण्यास कोणी नाही धजती


अस्वछ्ता करण्यास यांचे हातभार दिसती

कचऱ्याच्या नावाने हेच बोंबा मारती

नेता असतो फक्त मतांचा लाचार

सर्व काही घडले तरी म्हणतो करू नंतर विचार


Rate this content
Log in