STORYMIRROR

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Others Tragedy

3  

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Others Tragedy

राजकारणी

राजकारणी

1 min
14K


राजकारणी हे, सारेच दुतोंडी, जनतेची कोंडी, करतात

‘जन’ धनावर, मारुनिया डल्ला, आपुलेच खिसे, भरतात


कशाचा कशाशी, नसे पायपोस, जनतेला डोस, पाजतात

हात जोडणारे, नंतरच्या काळात, बेबंद होतात, माजतात


जात हो तयांची, असे सरड्याची, चटकन रंग, बदलतात

जराही परिणाम, होत नाही कारण, गेंड्यांची कातडी, पांघरतात


जनतेशी यांना, नसे देणेघेणे, ढोल स्वतःचेच, वाजवतात

क्रूरता असो वा, नीच वृत्ती, जंगली श्वापदांना, लाजवतात


एकमेकांवर, सदा कुरघोडी, काढतात खोडी, दिवसरात

एकमेकांचे हे, सगेसोयरे, जिरवतात मलिदा, आतल्या आत


पक्ष कुठलाही, जरी असो यांचा, एकसारखेच सारे, वागतात

उगवतीचा असे, सूर्य जयाचा, भजनी तयाच्या, लागतात


लाज शरम यांनी, टाकली विकून, दिली हो फेकून, उरलेली

सदा चाले विचार, तिरक्या चालींचा, जात असे यांची, मुरलेली


जनता करते, यांना मतदान, दिवस आपुले, पालटाया

पालटती दिवस, नेतेमंडळींचे, जनतेचे प्रयास, जाती वाया


Rate this content
Log in