विद्रोही शिक्षण
विद्रोही शिक्षण


गरीबांच्या शिक्षणाचा गळा कुणी कापला ?
लोकशाहीत शिक्षणावर घाव कुणी घातला ?
समतेच्या विचारांचा इथे घातपात झाला
न्याय शिक्षणाचा गरीबांस, देण्या कुणी नाही उरला.
शिक्षणात विषमतेचा खेळ कुणी मांडला ?
नाही वाली शिक्षणाला, त्यांच्या भविष्याला
होते तळमळ गरीबांची, नाही कदर कुणाला
समता शिक्षणाची का दिसेना जगाला ?
गरीब, श्रीमंतीच्या दरीत गरीब शिक्षणास मुकला
अंधारमय त्यांचे जीवन, नाही अर्थ जगण्याला
तुटपुंज्या शिक्षणाने, अंधार भविष्याला
मानवसेवा हा विचार, धूळीस मिळाला.
महासत्तेच्या युगात, त्याला प्रकाश का दिसेना ?
आर्थिक शोषण शिक्षणात, न्याय कुणी का करेना?
स्वस्त शिक्षणाची बालकाला योजना का येईना ?
स्वातंत्र्यात त्यांना शिक्षणाचे हक्क का मिळना ?
कित्येक उठाव, उद्रेक झाले बंदिस्त
ध्येय वेडी माणसे का दिसेना जगात ?
लोकशाहीची मूल्ये फक्त का पाठ्यपुस्तकात ?
दर्जेदार शिक्षण, असते कुणाच्या घरात?