STORYMIRROR

Ashwini Kabade

Others Tragedy

3  

Ashwini Kabade

Others Tragedy

कधी कधी असे का होते

कधी कधी असे का होते

1 min
14.2K



कधी कधी असे का होते

आपले प्रेम कुणासाठी इतके कसे सहज होऊन जाते

की त्याचे अस्तित्व असुन नसल्यासारखे होते...


कधी कधी असे का होते

उरात भरुन आलेले प्रेम व्यक्त करण्यापूर्वीच वेळ निघून जाते

उफाळून आलेल्या भावनांचे अस्तित्व क्षणात विरुन जाते...


कधी कधी असे का होते की

स्वतःलाच स्वतःचेच अस्तित्व शोधावे लागते

समोर असलेल्या आरशात असलेले आपलेच प्रतिबिंब परकेसे होऊन जाते


कधी कधी असे का होते

की कुणाच्या इतक्या जवळ असून देखील

दोघांत कोसो मैलांचे अंतर असते.......


कधी कधी असे का होते

खूप काही मिळवण्याच्या नादात खूप काही गमवले जाते

आणि जे मिळवायचे होते ते मिळाल्यावर तो आनंद वाटायला सोबत कुणीच नसते.....


कधी कधी असे का होते

आयुष्य हे फक्त जिवंत असण्याचे लक्षण होऊन जाते

त्याच आयुष्यात जगायचे राहून जाते.........


Rate this content
Log in