आयुष्य क्षणभंगुर आहे...
आयुष्य क्षणभंगुर आहे...
आयुष्य क्षणभंगुर आहे,
आज आहे उद्या नाही,
आज आहोत सोबत उद्या कदाचित नाही
मग कशाला द्यायची कसलीही ग्वाही!
उद्याच्या समीकरणांवर आजची आपली भिस्त
उगाच म्हणुन लावली का आपणही शिस्त
आजच्या आज जगायची सवय आता लावायची
उद्या कोण जाणे आपली एक्झीट येउन ठेपायची
उद्याच्या भविष्यावर ठेवा की हो विश्वास,
पण आज विसरु नका घ्यायला तो मोकळा श्वास
काल ज्यांच्यांवर रागावलात, आज त्यांना करा माफ
उद्या कोणास ठाऊक, कुणाचा जीवनपट साफ...
कितीही झिजलो, कितीही राबलो
तरी उद्याची शाश्वती नाही,
मग आजच्या आज जगायला शिका
नाही तर उद्या आपण शिकायला राहतो की नाही.
आयुष्य क्षणभंगुर आहे,
आज आहे उद्या नाही,
आज आहोत सोबत उद्या कदाचित नाही
कशाला द्यायची कसलीही ग्वाही!
