सॉरी गं आई...
सॉरी गं आई...
1 min
305
सॉरी गं आई
नेहमी असते मला मरणाची घाई...
खुप काही सांगायचे असते तुला,
खुप काही बोलायचे असते,
पण घड्याळ्याच्या काट्याशी असते माझी लढाई...
सॉरी गं आई
मी आजकाल जास्त बोलत नाही...
कधी तुझ्या मांडीवर हलकेच डोके टेकवायचे असते...
तर कधी उगाच तुला मिठी मारायची असते...
पण माझ्याच बाळाला गावी लागते मला अंगाई...
सॉरी गं आई
आपल्या सोबत बाहेर जाण्याला कधीचा मुहुर्त नाही...
ऑफिस आणि घर दोघे सांभाळत खेळत असते मी पळापळी...
सॉरी गं आई...
माझ्या प्रत्येक चुकीसाठी...
आई झाल्यावर कळतेय मला तुझी पुण्याई...
