बाबा, अजुनही तू मला लागतो...
बाबा, अजुनही तू मला लागतो...
1 min
263
बाबा, अजुनही तू मला लागतो..
घरातुन बाहेर पडतांना, सहजच दोन पावलं मागे वळुन
बोलायला तू नसतोस...
लोक इथे हसायला कारणं शोधतात,
विनाकारण निखळ हसणारा तू माझा एकुलता सोबती
आजकाल नेहमी गायब असतो
बाबा, अजुनही तू मला लागतो...
नात्यांच्या गुंत्यात गुंतलेले असताना
तुझ्या साध्या-सरळ शब्दांचा आधार हवा असतो..
जेरीस आलेला जीव माझा,
तुझ्या खांद्याचा विसावा शोधत असतो...
स्वतःच्या पायांवर केले तु उभे मला,
पण कधी पाय अडखळला तर सावरायला
तू तेव्हा नसतोस...
काय सांगु मी..
बाबा, अजुनही तू मला लागतो...
कितीही पुढे गेले तरी,
कितीही मोठेही झाले मी..
पण माझ्या बाबाचा हात माझ्या हातात लागतो...
बाबा, अजुनही तू मला लागतो..
