अनवट वाट
अनवट वाट
अनवट वाट...
दिवसागणिक दिवस ,
सरते उरते ,
रात्र कधी,
झुरते हरते,
काटे कधी अन्,
ताटवे फुलांचे,
ऋतु संगे ,
सोबती बदलते,
उदासवाणी कधी दिवाणी,
घडीघडींची दुनिया दिसते,
उन्हे घेऊनी डोक्यावर,
सावली लाजते ,
आडोश्याला कवडसे लपते,
जगण्याचीही रित कोणती,
भारावलेली कधी अनामिक,
चालायचीचं असते,
रोजचीच तरीही ,
अनवट वाट ...
