STORYMIRROR

Vishweshwar Kabade

Tragedy Others

3  

Vishweshwar Kabade

Tragedy Others

अंत्यसंस्कार

अंत्यसंस्कार

1 min
167

आयुष्यभर केलं त्या मातेने त्या पुत्रांसाठी काबाडकष्ट

म्हातारपणी त्यांनी तिला घराबाहेर हाकलून केलं नष्ट 


जीवंतपणी कधीही दिलं नाही तिच्याकडे लक्ष

केलंं तिला पूर्णपणे दुर्लक्ष


आजारपणातही सोडलं तिला वाऱ्यावर

त्यांनीच जे होते ते चांगल्या हुद्द्यावर


विसरुनी तिचे संस्कार

मोठ्या मुलाने चक्क नाकारला अंतिम संस्कार


राहिला तो गैरहजर

इतर दोन भाऊ दर्शन न घेता मातेचं लांब हजर


ज्या मातेनं दाखवली ही जत्रा

तिचीच काढावी लागली तिन्ही बहिणींनाच अंत्ययात्रा


लेकीच निघाल्या लेकांपेक्षा सर

केेला त्यांच्या मातेचा अंत्यसंस्कार


दिवट्या पुत्रांनी लावला त्या मातेच्या मायेला डाग

लेकींनी बजावले कर्तव्य देऊनी तिच्या

मृृतदेहास अग्निडाग


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy