STORYMIRROR

UMA PATIL

Romance

1  

UMA PATIL

Romance

अंतरी तू

अंतरी तू

1 min
543



तुजविण मज, कोणी नसे

अंतरी तू, हृदयी वसे


स्वप्न दिसते, प्रेमात मी

तूज बघता, गाली हसे


शब्द ओठी, जाणून घे

गूज माझे, बोलू कसे ?


मिसळले मी, प्रीतीत या

रंगले रे, पाणी जसे


वाटतो तू, आहे इथे

भास होती, रोजच असे


साथ द्यावी, जन्मात या

आवडे तू, जवळी बसे


गुंतला का, माझ्यात रे ?

सांग ना मज, वाटे तसे


इष्क झाला, जीव भाळला

मी दिवानी, तुजला फसे


श्वास माझा, तू 'राजसा'

या 'उमा'वर, उमटे ठसे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance