अंतराळकन्या
अंतराळकन्या
भारताची अंतराळकन्या
ध्येयनिष्ठ कल्पना चावला
अंबरातील संशोधनाचा
एकच ध्यास मनी बाळगला
कष्ट प्रयत्न जिद्द ठेवूनी
तन मन धन अर्पिलेले
एरोनॉटिक इंजिनियर
स्वप्न सत्यात अवतरले
निगर्वी सालस ही सुकन्या
क्षितीजे विस्तारुन धावली
निवड हुशारीच्या बळावर
मोठ्या मोहिमेवर जाहली
घेतली भरारी सुकन्येने
झेप अंतराळात यानाने
कार्य अवघड यशस्वीपणे
केले अत्यंत चतुराईने
यशस्वी आनंदी बालिकेने
दिला परतीचा संदेशही
पण हाय दुर्दैवाचा घाला
पडला सर्वांच्या अंगावरी
दुर्दैवाने यानाचे तुकडे
दशदिशांत फुटूनी गेले
तरुण युवतीचे कर्तृत्व
अंतराळात विरुनी गेले
अवघे विश्वच आघाताने
सुन्न मनी हळहळले
कल्पनाच्या अवचित मृत्यूने
अंतराळही हेलावले
