STORYMIRROR

harshada joshi

Abstract

4  

harshada joshi

Abstract

अनोळखी स्वप्न

अनोळखी स्वप्न

1 min
273

प्रत्येक स्वप्न सुंदर असतं

सत्याहून ही अधिक

वास्तवापेक्षा विलक्षण

पण अचानक केव्हातरी

विरून जातं स्वप्न जेव्हा 

पुसट होतात स्वप्नछटा तेव्हा 

उद्ध्वस्त होतो मनाचा गाव

यालाच मिळते मग वाईट स्वप्नाचे नाव ....

भीती वाटते आता भूतकाळात शिरताना 

अडखळतात पाऊले स्वप्नात डोकावताना ...

चुरगाळली स्वप्नफुले नशिबाने 

कळ्या असताना ....

स्वप्नांचे सारे रंग विखूरले 

रंगात येताना .....

दिसते राख जगाला 

का? दिसते तरी मला 

निखाऱ्यात मन धगधगताना...

डाळ शिजण्याआधीच 

पाहिली मी करपताना....

सोडले मी गाव वाईट स्वप्नाचे 

नवीन स्वप्नांचे नवरंग भरताना .....

शिकवून गेले परि स्वप्न मला ते 

हात मोकळे करताना ....

घालून जावे वळसा रस्त्यांना 

प्रवाहात चालताना .....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract