अण्णाभाऊ साठे….!
अण्णाभाऊ साठे….!
आण्णा म्हणजे अण्णा होते
हे कोणी सांगणे नको
त्यांच्या लेखणीची तुलना
करणे नको
लेखणी अशी झिजली
की तिने बाकी काही ठेवले नाही
जे जे लिहिले ते ते
कमी कधी वाटत नाही
मनमुराद आस्वाद घ्यावा
ज्याने त्याने गर्भात शिरून
अंतःकरणास खिळून ठेवीते ती
मायेने हात डोईवरी कुरवाळून...
आशा सदृढ लेखणीस स्मरूनी
वंदन करू आज थोडे लवून....!
अण्णाभाऊच्या चरणी
ही काव्यसुमनांजली.....!
