*अन्नदाता शेतकरी
*अन्नदाता शेतकरी
वसुंधरेवर मानवामानवात आहे
प्रेम,आपुलकी, मायेचा निवास
इथे मानवाच्या कष्टाला पर्याय नाही
येई मानवाच्या श्रमाला घामाचा सुवास....
शेतात शेतकरी कष्ट करतो
धान्य पिकवतो बैलांच्या साथीने
भुकेल्या मानवाला शेतकरी
अन्नधान्याचा साठा पुरवितो आपुलकीने...
सार्या जगाचे तो पोट भरतो
स्वतः शेतात घाम गाळतो
उन्हातान्हात राब राब राबतो
उभ्या शिवारात काम करतो.....
माया करतो शिवारावर लेकरागत
बी बियाणे पेरतो,खत घालतो
निगा राखतो तो रोपांची
मनवरूपात देवच जणू भासतो....
पीक हाती येण्यासाठी हो
आख्ख्या घरादाराची मदत घेतो
बैलांना कृतज्ञता म्हणून बैलपोळा सण करतो
जगाचा पोशिंदा,"अन्नदाता" तो होतो....
"अन्नदाता" जगाचा बनूनी
स्वतः राहतो कधी उपाशी
नाही आले फेडता त्याला कर्ज
जातो नाहक तो फासाशी.....
