STORYMIRROR

Smita Doshi

Inspirational

4  

Smita Doshi

Inspirational

अन्न

अन्न

1 min
417

पोट आहे म्हणून ते भरतच रहायचं

पोटाची कचराकुंडी करून

जीवाचा नाहक बळी द्यायचाच

पोट असलं तरी पोटापूरतंच खायचं असतं


सटरफटर त्यात भरायचं नसतं

आज मैद्यानं पोटावर राज्य केलंय

पाव,पिझ्झा, बरगरचं शासन चाललंय

आतड्याला पार पिळवटून काढलंय


तरीही इटालियन, चायनीज ला जवळंच करायचंय

सात्विक आहार जाऊन फास्ट फूड आलंय

व्यायाम सोडून डाएट धरलं य

नैसर्गिकतेला सोडून कृत्रिमतेला धरलंय


माणसानं आज खण्यातच स्वतःला हरवलंय

मैद्यानं आली सुस्ती,सुचतेय नुसती मस्ती

कामाला उरक येईना,कामं पूरी होईनात

चिडचिड होत चाललीय


भसम्या झाला,वखवख वाढली

खाण्यासाठीच जणू जन्म आपुला

हिच वृत्ती होऊ लागली

स्वतःलाच कळेना खाणं महत्वाचं


की निरोगीपण महत्वाचं

वेळीच सावरा स्वतःला

निरोगी आयुष्य जगून

आनन्द घ्या क्षणाक्षणाचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational