STORYMIRROR

Jyoti gosavi

Inspirational

4  

Jyoti gosavi

Inspirational

अंकुरते जीवन

अंकुरते जीवन

1 min
286

पाणी हेच जीवन

पाण्यामुळे जीवन

छोट्याशा थेंबांनी देखील

अंकुरते जीवन


योग्य देखभाल

प्रेमाचे सिंचन

तरी असेच फुलेना

तुमचेही जीवन


इवलेसे रोप होते

उद्याचा मोठा वृक्ष

पर्यावरण संवर्धनात

असतोच तो दक्ष


वृक्षाला देखे मिळाली पाहिजे

स्वतःच्या बचावाची संधी

आग लावतो रोपे आपण

उद्या छाटतो फांदी फांदी


अरे माणसा माणसा

असा दुटप्पी पणा करू नको

स्वतःच्या हाताने आपल्या

मुलाबाळांचे भविष्य मारू नको


आज लावा जर रोपटी

तर उद्या बहरतील फळे

त्याची मधुर मधुर चव

साक्षीला तुमचीच मुलेबाळे


आज नावान रोपटी

उद्या फुलतील वने

नांदेल येथे सुखाने

पुढच्या पिढ्या आनंदाने


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational