अंगणी
अंगणी
फुलंही बहरली
वेलीही बहरल्या
मुलं मुली साजऱ्या
अंगणी डवरल्या।।धृ।।
माझ्या रे परसात
मागील अंगणात
कारली दोडका रे
अंगणी सजविल्या।।१।।
गच्चीवर कोपरा
रंगीबेरंगी बरा
गुलाब फुलांनी तो
सजग भुषविल्या ।।२।।
पायरी ती कुंड्यांची
उतरंड फुलांची
मनोहारी पद्धती
एकेक फिरविल्या।।३।।
गवती हिरवळ
पायी चालणे बळ
मधोमध हौदात
कमळे फुलविल्या ।।४।।
लाजाळू लाजवंती
जाई जुई शेवंती
रातराणी गोजऱ्या
दारी पसरविल्या।।५।।
घराचे घरपण
दाराचे दारपण
मळवटी असा त्या
अंगणी सजविल्या।।६।।