अंधश्रद्धा
अंधश्रद्धा
लिंबू मिरची जुनी झाली
अंधश्रद्धा आता वेगळी झाली
कोणी म्हणे हा दिवस हा वार खास
कोणाला अजूनही परंपरेवर अंध विश्वास,
अजूनही कमी झाल्या नाहीत
देवळातल्या रांगा,
वाढतच आहे भक्तांचा
जातीयवादावर वरचेवर दंगा...
माणूस म्हणून कोणी कोणाला पुसेना
देव दारी असून माणसाला दिसेना,
असंख्य बळी गेले अंधश्रद्धे पोटी
तरी सुधारत नाही समाज, वचने देतो खोटी...
चला मिटवूया अंधश्रद्धा या धरतीवरून
ठेवूया विश्वास, कर्तृत्वावर मानवतेवर..
आणि रुजवूया रोपटे विश्वासाने,
करूया वाटचाल नव्या युगाच्या संगतीने!!
